औरंगाबाद | कोरोनाची दुसरी लाट गेली असली तरी रुग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक सुरूच आहे. बुधवारी रात्री धूत हॉस्पिटलमध्ये पैठण तालुक्यातील चाळीस वर्षीय तरुणाचा मृतदेह 56 हजारांसाठी अडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. युवा सेनेच्या प्रशासनाला जाब विचारल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
धूत हॉस्पिटलमधील हि दुसरी घटना आहे. मागील महिन्यातच धूत हॉस्पिटमध्ये असाच एक मृतदेह अडवून ठेवला होता. प्रशासनाने जाब विचारला तेव्हा नातेवाईकांच्या हातात मृतदेह देण्यात आला होता. पैठण तालुक्यातील बाळासाहेब थोरे (वय 40) यांना उपचारासाठी धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गेल्या आठ दिवसांपासून उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मात्र धूत रूग्नालय प्रशासनाने मृतदेह ताब्यात दिले नाही. पहिले 56 हजार रुपये भरा मगच मृतदेह ताब्यात देतो असे प्रशासनाचे म्हणणे होते. पहिलेच रुग्णांच्या नातेवाईकांनी पावने दोन लाख रुपये दिले होते. आता परत 56 हजार रुपये कुठून आणायचे आता आमच्याकडे पैसे नाहीत. अशी विनवणी नातेवाईकांनी गेली.
मात्र, प्रशासनाला थोडा पण पाझर फुटला नाही. यानंतर नातेवाईकांनी रडारडी सुरू केली. त्यांची आरडाओरड पाहून अक्षय पाथ्रिकर यांनी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांना घडलेला प्रकार सांगितला. शिंदे हे सागर खरगे, अवधूत अंधारे, शिवा कावळे, आकाश घुनावत आदी पदधिकार्यांना घेऊन धूत हॉस्पिटल मध्ये आले. नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी कॅश काउंटर वरिल कर्मचारी आणि प्रशासनाला धारेवर घेतल्यानंतर एका दिवसाचे जास्तीत जास्त 9 हजार रुपये शुल्क शासनाने ठरवून दिले आहे. मग एवढे बिल कसे काय झाले आणि परत 56 हजार कसले मागत आहे. असा जाब विचारला तेव्हा प्रशासनाने अखेर मृतदेह नातेवाईकांना दिला.