पुणे | संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी सुरू झाली आहे. सकाळी 8 वाजेपासून या मतमोजणीला सुरूवात झाली असून पोस्टल मतदानाचे आकडे समोर आले आहेत. यामध्ये चिंचवडमधून भाजप तर कसब्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
पोस्टलचा निकाल पहा, कसब्यात मतमोजणी थांबवली
पोस्टल मतदानात चिंचवड येथे भाजपाच्या अश्विनी जगताप यांनी 347 मतांनी आघाडी घेतली. तर कसब्यातून महाविकास आघाडीचे रविंद्र धांगेकर यांनी 200 मतांनी आघाडी घेतली आहे. तर पहिल्या फेरीत चिंचवड मतदार संघात भाजपाच्या अश्विनी जगताप यांनी 4171, महाविकास आघाडीचे नाना काटेंना 3064 तर अपक्ष राहूल कलाटे यांनी 1674 अशी मते मिळाली आहेत. अतापर्यंत अश्विनी जगताप या जवळपास 450 मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत रविंद्र धनगेंकर हे 3 हजार मतांनी आघाडीवर आहेत. काॅंग्रेसने पोस्टल मतमोजणीवर आक्षेप घेत मतमोजणी थांबवली आहे.
चिंचवड व कसबा या दोन्ही निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही जागांवर आपलाच उमेदवार विजयी व्हावा यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अगदी सर्वांनीच मोठा प्रचार केला होता. दुसरीकडे सत्ताधारी भाजपला धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी सुद्धा प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे या दोन्ही जागेवरील निवडणूका चांगल्याच गाजल्या होत्या.