सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे अगदी स्थानिक गाव पातळीवर राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 80.14 टक्के मतदान झाले असून आता प्रत्यक्ष मतमोजणीस थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यात शिंदे-भाजप सरकारची जादू चालणार का? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी ही मतमोजणी पार पडत आहे. सातारा येथील शाहू स्टेडियम येथे मतमोजणी पार पाडत असून मतमोजणीच्या स्थळाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत. या निवडणुकीत शिंदे-भाजप श राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्यात शिंदे-भाजप सरकारची जादू चालणार का?; ग्रामपंचायत निवडणूकीस थोड्याच वेळात सुरुवात pic.twitter.com/UGOGNskE4v
— santosh gurav (@santosh29590931) December 20, 2022
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सातारा जिल्ह्याला ओळखले जाते. हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निम्मिताने शिंदे-भाजपने खूप कष्ट घेतले आहेत. राज्यात सत्ताताब्यात घेतल्यानंतर आता स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून नमविकास आघाडीतील पक्षांना शह देण्यासाठी भाजप शिंदे गटाकडून ग्राम्पाच्यात निवडणुकीत उमेदवार उतरवण्यात आले आहेत.