कोल्हापुरमध्ये नवरदेवाने वरातीदरम्यान केला गोळीबार, Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – लग्नाचा क्षण प्रत्येकासाठी खास असतो. आपले लग्न खास बनवण्यासाठी नवरी आणि नवरदेव काहीतरी खास आणि हटके करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र उत्साहाच्या भरात ते असे काही करतात ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढतात. अशीच एक घटना कोल्हापुरमध्ये घडली आहे.

काय आहे प्रकरण?
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील सडोली या ठिकाणी एका वरातीत नवरदेवाने चक्क बारा बोअरच्या बंदुकीने हवेत गोळीबार (gun firing) केला. अतिउत्साहाच्या भरात गोळीबार (gun firing) करणे या नवरदेवाला चांगलेच भोवले आहे. या गोळीबार प्रकरणी नवरदेव अजयकुमार पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नवरदेवाच्या आसपास भरपूर गर्दी आहे. हे सर्व लोक वरातीमध्ये नाचण्याचा आनंद घेत आहे. काही तरुणांनी नवरदेवाला आपल्या खांद्यावर उचललं आहे. नवरदेवाच्या हातामध्ये बंदुक आहे आणि तो याने हवेत गोळीबार (gun firing) करत आहे. वरातीत उपस्थित असणाऱ्याच कोणीतरी हवेत गोळीबार (gun firing) केलेल्या या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी नवरदेव अजयकुमार पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या