औरंगाबाद प्रतिनिधी | प्रेम बंधनात अडकलेले जोडपे घरच्यांचा विरोध झुगारून नोंदणी पद्धतीने लग्न करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर काही जणांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जोडप्याला ताब्यात घेत एमायडीसीवाळूज पोलिसांच्या हवाली केले.
वाळूज परिसरातील साजापूर भागात शुभम सोनार याचे परिसरातील एका 18 वर्षीय मुली सोबत प्रेम संबंध जुळले होते. मुलीने शुभम सोबत लग्न करण्याचा हट्ट धरला होता. मात्र दोघेही वेगवेगळ्या जातीतील असल्याने घरातील मंडळींनी विरोध केल्याने तरुणी दोन दिवसापासून घरातून बेपत्ता होती. या प्रकरणी मंगळवारी सकाळी मुलीच्या आईने एमायडीसीवाळूज पोलीस ठाण्यात तरुणी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर जोडपे मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी पोहोचले. खरेदी करत असताना काही जण त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी असल्याचे दिसताच त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जोडप्याला ताब्यात घेतले. ते बेपत्ता असल्याची नोंद एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दाखल असल्याने त्यांनी दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी दोघांच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. पुढील तपास औरंगाबाद पोलीस करत आहेत.
इत्तर महत्वाच्या बातम्या –
मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांचा भाजप प्रवेश
आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये येणार : चंद्रकांत पाटील
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र वंचित आघाडीत जाणार
आपसातले मतभेद विसरा संकट मोठं आहे एक होऊन लढा : बाळासाहेब थोरात
राष्ट्रवादीची मान्यता जाणार ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया
युतीने तिकीट नाकारल्यास शिवसेनेचा हा जिल्हाध्यक्ष लढवणार अपक्ष निवडणूक