हळहळजनक! प्रेमी युगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या; घरातून प्रेमसंबंधाला होता विरोध?

अहमदनगर प्रतिनिधी | दरेवाडी येथे प्रेमी युगुलाने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मोना पथारे (वय २१ वर्ष) आणि अजय बडेकर (वय २२ वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या तरुण तरुणीची नावे आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिस तपास करत आहे.

सदर तरुण तरुणी यांच्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते अशी चर्चा आहे. मात्र तरुणीच्या घरातून त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध होता असे बोलले जात आहे. शुक्रवारी दोघांनीही विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समजत आहे. शनिवारी सकाळी तरुणीचा मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आले. यावेळी तरुणाचे कपडेही नजरेस पडल्याने पोलिसांनी विहिरीत शोध घेतला. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी अग्निशमन दलाची गाडी बोलावून गाळात अडकलेला तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

दरम्यान, सदर मृत तरुण तरुणी यांच्या प्रेमसंबंध होते का याबाबत पुष्टी मिळू शकलेली नाही. तसेच त्यांच्या आत्महत्येमागील कारणही अद्याप समजू शकलेले नाही. अहमदनगर पोलिस या घटनेचा पुढील तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like