जाणून घ्या! देशात आतापर्यंत करोनाचे किती नवे रुग्ण, किती जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोना दिवसेंदिवस आणखीनच फोफावत चालला आहे. वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळं परिस्थिती आणखी चिघळत असल्याचे दिसत आहे. संपूर्ण देशात आतापर्यंत ५ हजार ७३४ नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. आज दिल्लीत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली.

या पत्रकार परिषदेदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या चिंतेत अधिक भर घालणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासाच्या कालावधीत ५४९ जणांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. करोना व्हायरसमुळे देशात १६६ जणांचा मृत्यू झाला असून कालपासून १७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, देशात ४७३ जण करोना मुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असल्याची दिलासादायक माहिती लव अग्रवाल यांनी दिली. करोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी भारतीय रेल्वेने त्यांचे २५०० हजार डॉक्टर आणि ३५ हजार वैद्यकीय सहाय्यकांची फौज सज्ज ठेवली आहे.

करोनाच्या संकटात रेल्वेची सर्व रुग्णालयेही मदत करणार आहेत. याचबरोबर भारतीय रेल्वे ८० हजार आयसोलेश बेड सज्ज ठेवणार असून रेल्वे ५ हजार डबे आयसोलेश वॉर्डमध्ये बदलणार आहे. त्यापैकी ३२५० डब्यांचे आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतर केलं असल्याचेही  अग्रवाल यांनी सांगितलं. करोना व्हायरसपासून बचाव करणारी उपकरणे, मास्क आणि व्हेंटिलेटर्सचा पुरवठा सुरु झाला आहे. देशातीलच २० उत्पादक पीपीईची निर्मिती करणार आहेत. ४९ हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली आहे अशी माहितीही अग्रवाल यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

Leave a Comment