हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रोज झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान शुक्रवारी राज्यात १० हजार २१६ व्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २० लाख ५५ हजारांवर पोहोचली आहे.
मात्र रुग्ण वाढत असले, तरी राज्यातील कोरोना रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यांच्या दरम्यानच आहे. त्यामुळे ही एक दिलासादायक बाब म्हणता येईल.
राज्यात आज 10216 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6467 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2055951 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 88838 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.52% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 5, 2021
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’