नवी दिल्ली । जगभरासह भारतात कोरोना महामारी थैमान घालत आहे. देशात कोरोना संकट दिवसेंदिवस आणखी गहिरं होत आहे. दररोज कोरोना संक्रमितांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. भारतात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ लाखांच्या पुढे गेली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत ७७ हजार २६६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे.
मागील २ दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला ७५ हजारांपेक्षा जास्तने वाढत आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज ६० ते ६५ हजाराने वाढत होती. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ लाख ८७ हजार ५०१ इतकी झाला आहे. गेल्या २४ तासात ७७ हजार २६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १ हजार ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादाय बाब म्हणजे २५ लाख ८३ हजार ९४८ रुग्णांनी कोरोना मुक्त झाले आहेत.
देशात कोरोना चाचणीची संख्या झपाट्यानं वाढल्यामुळे रुग्णसंख्याही वाढत आहे. दिलासादायक म्हणजे, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७५ टक्केंपेक्षा जास्त आहे. देशात सध्या ७ लाख ४२ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ६१ हजार ५२९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश व तामिळनाडू या प्रमुख राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”