Saturday, March 25, 2023

कोरोनाचा उद्रेक! देशभरात मागील २४ तासांत आढळले तब्बल ९६,५५१ कोरोना रुग्ण

- Advertisement -

नवी दिल्ली । देशातील करोनाची परिस्थिती चिंताजनक असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट दिसतंय. गेल्या २४ तासांत तब्बल ९६,५५१ रुग्ण आढळलेत. हा आत्तापर्यंतचा एका दिवसातला सर्वात मोठा आकडा आहे. तर एकाच दिवशी तब्बल १ हजार २०९ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावलेत. याचसोबत देशातील एकूण रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ वर पोहचली आहे.

एकूण रुग्णांच्या संख्येपैंकी ९ लाख ४३ हजार ४८० जणांवर उपचार सुरू आहेत. भारतात आत्तापर्यंत ३५ लाख ४२ हजार ६६४ रुग्णांनी करोनावर मात केलीय तर भारतात करोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ७६ हजार २७१ वर पोहचली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यांमुळे देशाच्या चिंतेत भर पडलीय. महाराष्ट्रात दररोज रुग्णांच्या संख्येत रेकॉर्डब्रेक भर पडताना दिसत आहे.

- Advertisement -

रुग्णसंख्येत क्रमांक १ वर असलेल्या महाराष्ट्रानं अद्याप आपलं यादीतलं स्थान कायम राखलंय. महाराष्ट्रात सध्या २ लाख ५३ हजार १०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २७ हजार ७८७ जणांचा मृत्यू झालाय. दिलासादायक म्हणजे तब्बल ६ लाख ८६ हजार ४६२ रुग्णांनी करोनावर मात केलीय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.