देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाखाच्या पुढे; मागील २४ तासात संख्येत सर्वाधिक ८९०९ने वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकड्याने २ लाखांचा टप्पा गाठला असून मागील 24 तासात 8 हजार 909 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची ही वाढ आतापर्यंतची 24 तासातली सर्वाधित वाढ आहे. तर गेल्या 24 तासात 217 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 7 हजार 615 झाली आहे. त्यापैकी 5 हजार 815 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 303 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 4 हजार 776 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 48.31 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच एक्टिव्ह रुग्ण 1 लाख 1 हजार 497 आहेत. देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 72300 झाला आहे. त्यातील 31333 बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 2465 जण मृत्यूमुखी पडले आहेत.

महाराष्ट्रात काल 1225 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 31 हजार 333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचं प्रमाण राज्यात वाढताना दिसतंय. दरम्यान, काल कोरोनाचे 2287 नवे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात 38 हजार 493 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment