हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होते आहे. शहरी आणि ग्रामीण भागातही त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहेत. आता क्रेडिट कार्ड युझर्सनाही डेबिट कार्डप्रमाणे UPI द्वारे पेमेंट करण्याची सुविधा मिळणार आहे. RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली.
आता पहिले स्वदेशी RuPay क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केले जाईल. यानंतर व्हिसा आणि मास्टरकार्ड सारख्या इतर कार्डधारकांनाही यामध्ये जोडले जाईल. इथे हे लक्षात घ्या कि, आत्तापर्यंत ग्राहकांना फक्त आपले डेबिट कार्डच UPI शी लिंक करता येत होते.
ऑनलाइन पेमेंटसाठी नवीन पद्धत
RBI गव्हर्नर पुढे म्हणाले कि, “आतापर्यंत फक्त सेव्हिंग/करंट अकाउंटच डेबिट कार्डद्वारे UPI ट्रान्सझॅक्शनसाठी लिंक केले जाऊ शकत होते. मात्र आता UPI प्लॅटफॉर्मवर क्रेडिट कार्ड देखील लिंक करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यामध्ये सुरुवातीला RuPay Credit Card UPI शी लिंक केले जाईल. तसेच यामुळे ग्राहकांना UPI प्लॅटफॉर्मद्वारे पेमेंट करण्यासाठी आणखी पर्याय मिळेल.”
अनेक ग्राहकांना मिळणार फायदा
UPI हे देशातील सर्वात लोकप्रिय पेमेंट प्लॅटफॉर्म बनले आहे. जवळपास 26 कोटी लोकांकडून UPI चा वापर केला जातो. त्याचवेळी 5 कोटींहून जास्त व्यापारी देखील त्याचा वापर करत आहेत. अशातच आता Credit Card देखील UPI शी लिंक केल्यास ग्राहकाला पेमेंटसाठी एक नवा पर्याय मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
RBI कडून दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ
RBI कडून आज पुन्हा रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली गेली. यावेळी 4.90 टक्क्यांनी वाढ केली आहे. तसेच आर्थिक वर्ष 2023 मध्ये किरकोळ महागाई 7.5 टक्के राहण्याचा अंदाज देखील यावेळी व्यक्त केला गेला आहे. मात्र, Credit Card वापरून केलेल्या UPI ट्रान्सझॅक्शनसाठी मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) कसा लागू होईल हे अजूनही स्पष्ट झालेले नाही, कारण प्रत्येक ट्रान्सझॅक्शनसाठी व्यापारी ट्रान्सझॅक्शनची ठराविक रक्कम भरतो, जी नंतर बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्समध्ये वितरीत केली जाते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/
हे पण वाचा :
Rapo Rate Hike : होम आणि ऑटो लोनवर आणखी किती व्याज द्यावे लागणार ???
education loan : ‘या’ बँकामध्ये कमी व्याजदराने मिळेल शैक्षणिक कर्ज !!!
Ration Card मध्ये घरातील नवीन सदस्याचे नाव नोंदवण्याची प्रक्रिया जाणून घ्या
RBI ने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या ‘हे’ जाणून घ्या
RBI कडून रेपो दरात पुन्हा वाढ, आता EMI साठी द्यावे लागणार जास्त पैसे