‘हा’ खेळाडू एक गल्ली क्रिकेटर ते धडकी भरवणारा वेगवान गोलंदाज कसा बनला, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटच्या इतिहासात बरेच गोलंदाज आले आणि गेले मात्र वसीम अक्रम सारखा गोलंदाज आजपर्यंत कधीही झाला नव्हता आणि कदाचित यापुढेही होणार नाही. डावाखुरा वसीम अक्रमचा आज वाढदिवस आहे. ३ जून १९६६ ला लाहोरमध्ये जन्मलेला वसीम आज ५४ वर्षांचा झाला आहे. वसीम अक्रमने आपल्या २ दशकांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आणि मोडले. पाकिस्तानकडून अक्रमने ९१६ आंतरराष्ट्रीय बळी घेतले आहेत . इतकेच नाही तर फलंदाज म्हणून त्याच्या नावावर ६ हजाराहून अधिक धावा जमा असून त्यात ३ शतकांचा देखील समावेश आहे. अक्रमच्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला त्याच्या जीवनातील एक अशी गोष्ट सांगणार आहोत ज्याची माहिती फारच कमी लोकांना असेल.

गल्ली क्रिकेट खेळल्यानंतर वसीम अक्रम पाकिस्तानी संघात आला
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, जेव्हा वसीम अक्रमने पाकिस्तानकडून पदार्पण केले तेव्हा तो कोणतीही फर्स्ट क्लासची मॅच किंवा ‘लिस्ट ए क्रिकेट’ खेळला नाही. त्याऐवजी तो रस्त्यावर आणि उद्यानात क्रिकेट खेळायचा. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की, वसीम अक्रमने पाकिस्तान संघात प्रवेश कसा केला. तर माजी कर्णधार जावेद मियांदादने वसीम अक्रमला पाकिस्तानच्या संघात आणले होते.

अक्रम मियांदादच्या नजरेत आला
१९८४-८५ च्या सुमारास जेव्हा वसीम अक्रम लाहोरमध्ये फलंदाजीच्या अभ्यासाला गेला होता. मियांदादला त्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले होते. मियांदादने खुलासा केला होता की, ‘मी नेटकडे पहात होतो आणि तेव्हा मला तेथे एक सामान्य मुलगा गोलंदाजी करताना दिसला. मला फलंदाजीचा सराव करावासा वाटला आणि वसीम अक्रम तांत्रिकदृष्ट्या खूप स्ट्रॉंग असल्याचे जाणवले. मात्र अक्रमला स्वत: ला ही गोष्ट माहित नव्हती.

जावेद मियांदाद पुढे म्हणाले, ‘वसीम अक्रमला एक संधी देण्याचे मी मनापासून ठरवले आणि न्यूझीलंड दौर्‍यावर नेण्याचे पक्के केले. न्यूझीलंड दौर्‍यासाठी मी वसीम अक्रमचे नाव दिले. तेव्हा निवड समितीत एकच गोंधळ उडाला, ते म्हणाले की, या मुलाने अद्याप एकही फर्स्ट क्लास मॅच खेळलेली नाही आहे आणि तू त्याला न्यूझीलंडमध्ये नेण्याविषयी बोलतोय. यानंतर मी पीसीबीचे अध्यक्ष बट्ट साहेबांना सांगितले की,’ हा मुलगा माझ्या संघात खेळेल. त्यांनाही आश्चर्य वाटले पण ते म्हणाले की, जर कर्णधार म्हणत असेल तर अक्रमला एक संधी दिली गेली पाहिजे.’

पहिल्या दौर्‍यावर अक्रमने कहर केला
वसीम अक्रमने ऑकलंड येथील कसोटी सामन्यात डेब्यू केला होता, तेथे त्याने १०५ धावा देऊन २ बळी घेतले होते, परंतु डुनेडिन कसोटीत किवी फलंदाज वसीम अक्रमच्या माऱ्यासमोर पडले. दुसर्‍या कसोटीच्या दोन्ही डावात वसीम अक्रमने ५-५ विकेटस घेतल्या आणि मग या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाणे कधीही मागे वळून पाहिले नाही.

वसीम अक्रमचे रेकॉर्ड
वसीम अक्रमने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक विक्रम केले आणि मोडले. अक्रमने गोलंदाजी आणि फलंदाजीद्वारे नोंदवलेले विक्रम खालीलप्रमाणे.

१. वसीम अक्रमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण चार वेळा हॅटट्रिक केल्या आहेत, अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव गोलंदाज आहे. अक्रमने दोन वेळा एकदिवसीय आणि दोन वेळा कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे.

२. वसीम अक्रम एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०० बळी घेणारा पहिला गोलंदाज आहे. अक्रमने वनडेमध्ये ३५६ सामन्यातून ५०२ बळी घेतले आहेत. नंतर मुरलीधरनने त्याचा हा रेकॉर्ड मोडीत काढला.

३. वसीम अक्रम क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी एकदिवसीय वेगवान गोलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०० बळी घेणारा तो एकमेव वेगवान गोलंदाज देखील आहे.

४. वसीम अक्रम सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा सर्वोच्च रेटिंग असलेला खेळाडू आहे. त्याचे रेटिंग १२२३.५ होते जे ऍलन डोनाल्ड आणि मुरलीधरन सारख्या दिग्गजांपेक्षा जास्त आहे.

५. वसीम अक्रमने १९९६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद २५७ धावा फटकावल्या, जे कसोटी क्रिकेटमधील ८ व्या क्रमांकावरील कोणत्याही फलंदाजाद्वारे करण्यात आलेली सर्वोत्तम धावसंख्या आहे.

https://youtu.be/fzXhH5VU33I

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.