मुंबई : हॅलो महाराष्ट्र – 4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. या सीरिजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचाच्या दुसऱ्या सीझनला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर मागील काही इंग्लंड दौऱ्यात पराभव झाल्याने टीम इंडियाला हि सिरीज जिंकणे आवश्यक आहे. या सीरिजपूर्वी फ्रेश होण्यासाठी भारतीय खेळाडूंना ब्रेक देण्यात आला आहे.
भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विनने या ब्रेकमध्येही नवी तयारी सुरु केली आहे. जर अश्विनला इंग्लंडमध्ये वर्क व्हिसा मिळाला तर तो या टेस्टपूर्वी सराव व्हावा म्हणून कांऊटी क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे. अश्विन सरे या काऊंटी टीमकडून खेळण्याची शक्यता आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी झाल्यास 11 जुलै रोजी सुरु होणाऱ्या फर्स्ट क्लास मॅचमध्ये अश्विन मैदानात उतरणार आहे.
‘द ओव्हल’वर हा सामना खेळवण्यात येणार आहे. याच मैदानामध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि शेवटची टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे जर अश्विनला सरेकडून खेळण्याची संधी मिळाली तर ते त्याला फायदेशीर ठरणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी सराव न केल्याचा फटका टीम इंडियाला बसला होता. भारताच्या पराभवानंतर अश्विननेदेखील हि बाब मान्य केली होती.