मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार 13 जुलै रोजी या दौऱ्यातील पहिली वन-डे होणार होती. मात्र श्रीलंका टीमच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने हि वन-डे मालिका 18 जुलै रोजी होणार आहे. याची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. याचबरोबर बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला गंभीर इशारासुद्धा दिला आहे.
बीसीसीआयने श्रीलंकेला बॅक अप टीम तयार ठेवण्याची सूचना केली आहे. श्रीलंका क्रिकेट टीमच्या संबंधित व्यक्तींमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर पर्याय म्हणून बॅक टीम तयार करण्याची सूचना बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला केली आहे. श्रीलंकेचे बॅटींग कोच ग्रँट फ्लॉवर आणि सपोर्ट स्टाफ जीटी निराशेन या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने हि मालिका पुढे ढकलण्याची विनंती बीसीसीआयला केली होती. बीसीसीआयने ती मान्यदेखील केली होती.
तसेच बीसीसीआयने श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंचे हॉटेल बदलण्यात यावे अशी मागणी केली होती. या मागणीनंतर श्रीलंकेच्या सर्व खेळाडूंना कोलंबोतील ग्रँड सिनामन हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. या अगोदर भारत आणि श्रीलंका या दोन्ही टीम ताज समुद्रा हॉटेलमध्ये एकत्र होत्या. टीम इंडियामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून बीसीसीआयकडून हि विनंती करण्यात आली होती. आता श्रीलंका टीमचे नवे हॉटेल भारतीय क्रिकेट टीमच्या हॉटेलपासून 1.5 किलोमीटर दूर आहे.