मुंबई प्रतिनिधी | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सध्या खलनायकाच्या भूमिकेत सर्वांच्या मनात सलू लागला आहे. कारणही तसे तगडेच आहे. कारण भारतीय संघाला विश्वचषकाच्या सेमी फायनल मधून हार स्वीकारून मायदेशी माघारी यावे लागले आहे. तर या पराभवाचे खापर विराट कोहलीच्या खराब नेतृत्वावर फोडले जाते आहे.
ऑगस्ट महिन्यात भारतीय वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे. तेथे जाऊन भारतीय संघ महिनाभर वन डे , टी २० आणि कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी विराट कोहली जाणार नाही अशी चर्चा होती. अर्थात त्याला या दौऱ्यातून विश्रांती दिली जाईल असे वृत्त माध्यमात येत होते. मात्र विराट या दौऱ्याला जाणार आहे असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. विराट त्याची मानहानी भरून काढण्याचा या दौऱ्यात प्रयत्न करणार असे मत क्रिकेट तज्ञानीं व्यक्त केले आहे.
दरम्यान बीसीआयने विराट कोहलीची कर्णधार पदावरून उचल बांगडी करण्याचा निर्धार केला आहे. विराट कोहलीला कसोटी सामन्यात कर्णधार करायचा आणि वन डे सामन्याचे कर्णधार पद रोहित शर्माकडे सुपूर्द करायचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय संघात गटबाजी उफाळली आहे याला बीसीआयनेच एकप्रकारे दुजोरा दिला आहे.