लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची जगातील सर्वात खतरनाक फास्ट बॉलरमध्ये गणना करण्यात येते. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे यंदाची आयपीएल खेळू शकला नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने इंग्लिंश कौंटीमध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. जोफ्रा आर्चरने कौंटी मॅचमध्ये टाकलेला भन्नाट बनाना स्विंग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
Not a bad delivery! 😅
Two wickets for @JofraArcher against Surrey's second XI yesterday, including this one… ☄️ pic.twitter.com/vBc5s09l4B
— (C) Sussex Cricket 🏆 (@SussexCCC) May 7, 2021
जोफ्रा आर्चर कौंटीमध्ये ससेक्स टीमकडून खेळत आहे. त्याने सरे विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये जोरदार बॉलिंग केली. या सामन्यात त्याने बॉल उत्तमप्रकारे स्विंग केला. त्याने सरेचा बॅट्समन रिफरला ज्या प्रकारे आऊट केले त्यावरून याचा अंदाज येऊ शकतो. जोफ्रा आर्चरने रिफरला बनाना स्विंगवर आऊट केले. जोफ्रा आर्चरने टाकलेला बनाना स्विंग पाहून बॅट्समनदेखील हक्काबक्का झाला.
जोफ्रा आर्चरचा हवेत स्विंग झालेला बॉल बॅट्समनला कळालाच नाही आणि तो त्या बॉलवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. या सामन्यात जोफ्रा आर्चरने बॉलिंगसोबत बॅटींगमध्ये देखील उत्तम कामगिरी केली आहे. त्याने बॅटींग करताना ४६ बॉलमध्ये ३५ धावा केल्या त्यामध्ये ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात टेस्ट मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी आर्चरचा फॉर्म इंग्लंडसाठी खूप महत्वाचा असणार आहे.