खराब फॉर्ममध्ये राहुल द्रविडने दिला ‘हा’ सल्ला पृथ्वी शॉने केला खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ हा मागच्या आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये होता. आयपीएल नंतर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली पण त्याला या संधीचे सोने करता आले नाही. त्याच्या या खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. टीम इंडियातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉने जोरदार पुनरागमन करत विजय हजारे ट्रॉफीत त्याने सर्वाधिक रन करण्याचा विक्रम केला. तसेच यंदाच्या आयपीएलमध्येदेखील त्याने आपला फॉर्म सुधवरावला होता. यंदाच्या आयपीएल स्थगित होण्याअगोदर त्याने 166.49 च्या स्ट्राईक रेटने 308 रन काढले होते. त्याने आपल्या या फॉर्मचे सगळे श्रेय टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड याला दिले आहे.

राहुल द्रविडने ‘हे’ कधीच सांगितले नाही
राहुल द्रविड अंडर – 19चा कोच असताना टीम इंडियाने पृथ्वी शॉ याच्या नेतृत्त्वाखाली अंडर – 19 वर्ल्ड कप जिंकला होता.’मी 2008 साली विराट कोहलीच्या टीमने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकताना टीव्हीवर पाहिले होते. त्यावेळी मला हि कोणती स्पर्धा असते हे माहित पण नव्हते. मला माझ्या वडिलांनी या स्पर्धेचे नाव सांगितले. त्यानंतर मला या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली. तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. आमची टीम खूप चांगली होती.’ असे पृथ्वीने सांगितले आहे.

‘राहुल द्रविड यांच्या सोबत मी अंडर 19 वर्ल्ड कप सह इंडिया A टीममध्ये देखील खेळलो आहे. त्यांनी कधीही आमच्यावर एखादी गोष्ट थोपवण्याची किंवा लादण्याची गोष्ट केली नाही. तसेच त्यांनी माझ्या बॅटींगची नैसर्गिक शैली देखील बदलली नाही. मी ‘पॉवर प्ले’ मध्ये खेळलो तर चांगले रन काढेल, हे त्यांना चांगले माहित होते. त्यांनी मला कधीही मला स्वाभाविक खेळ खेळण्यापासून अडवले नाही.’ असे पृथ्वी शॉने सांगितले आहे. नैसर्गिक खेळ करण्याचा द्रविडचा सल्ला माझ्या खराब फॉर्ममध्ये कामी आला असे पृथ्वी शॉने सांगितले आहे. पृथ्वीची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नाही. तसेच जुलै महिन्यात टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात त्याची निवड होण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Comment