मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सात वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल स्पर्धेत एक जबरदस्त लढत झाली होती. तो सामना जिंकून मुंबईने ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश केला होता. त्या सामन्याची आठवण करुन देत मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला राजस्थान रॉयल्सने मजेशीर उत्तर दिले आहे. मुंबईने त्या मॅचमध्ये 14.4 ओव्हर्समध्ये 195 रन करत ‘प्ले ऑफ’ मध्ये आपला प्रवेश निश्चित केला होता. या मॅचमध्ये मुंबईच्या आदित्य तरेनी महत्वपूर्ण खेळी केली होती. आदित्य तरेनी राजस्थानचा बॉलर जेम्स फॉकनरनच्या बॉलवर सिक्स मारत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.
https://t.co/wbknzxDbDg pic.twitter.com/STGNby4W4y
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 25, 2021
आदित्य तरेने सिक्स मारल्यानंतर शर्ट वर करत मैदानातून धाव घेतली होती. मुंबई इंडियन्सने त्यावर एक त्यावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सने “कधीही हार मानता कामा नये. 7 वर्षांपूर्वी एक बॉल बाऊंड्री लाईननच्या पार गेला. तरे नॉर्थ स्टँडच्या दिशेने पळाला आणि संपूर्ण वानखेडे स्टेडियम सेलिब्रेशन करत होते.” अशा प्रकारचे ट्विट मुंबई इंडियन्सने केले होते. मुंबईच्या या पोस्टवर राजस्थान रॉयल्सने मजेशीर मिम्स शेअर केले आहेत. यामध्ये काही जण रडताना दिसत आहेत. ‘होय भावा सर्व माहिती आहे.’ असे कॅप्शन राजस्थान रॉयल्सने दिले आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी चांगल्या रनरेटसह राजस्थान रॉयल्सचा पराभव करणे गरजेचे होते. या सामन्यात मुंबईला 14.3 ओव्हरमध्ये 190 रनचे आव्हान होते या सामन्यात मुंबईने 14.3 ओव्हरमध्ये 189 रन करत बरोबरी साधली होती. यानंतर मुंबईला प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी 1 बॉलमध्ये 4 रन हवे होते. त्यावेळी आदित्य तरेने त्या बॉलवर सिक्स लगावत मुंबईला थरारक विजय मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.