WTCसाठी ‘फॉलो ऑन’च्या नियमाबाबत ICC ची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दुबई : वृत्तसंस्था – भारत आणि न्यूझीलंडमध्ये 18 जून ते 22 जून या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या फायनलकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. या टेस्टसाठी आयसीसीने अनेक नियम बनवले आहेत. यामध्ये ही टेस्ट टाय किंवा ड्रॉ झाली तर दोन्ही संघाना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येणार आहे. तसेच फायनलसाठी एक दिवस रिझर्व ठेवण्यात आला आहे. याबरोबरच ही मॅच फायनल ड्यूक बॉलने खेळवण्यात येणार आहे. आता आयसीसीने फायनल मॅचमधील फॉलो ऑनबाबत मोठी घोषणा केली आहे. या टेस्ट मॅचचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला तर अन्य टेस्ट मॅचसाठी असलेला नियमच फायनलमध्येही लागू होणार आहे. यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.’ अशी घोषणा आयसीसीकडून करण्यात आली आहे.

काय आहे नियम?
आयसीसीच्या प्लेईंग कंडिशन 14.1.1 च्या सामान्य फॉलो ऑनच्या नियमानुसार पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या टीमला 200 रनची आघाडी मिळाल्यानंतर ते प्रतिस्पर्धी टीमला पुन्हा बॅटींगसाठी आमंत्रित करू शकतात. 14.1.2 नियमानुसार 3 किंवा 4 दिवसांचा खेळ झाला तर 150 रन, 2 दिवसांच्या मॅचमध्ये 100 रन आणि एका दिवसाच्या मॅचमध्ये 75 रनची आघाडी फॉलो ऑन देण्यासाठी आवश्यक आहे.

जर पावसामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ झाला नाही तर 14.1 च्या नियमानुसार खेळातील बाकी दिवसांच्या संख्येनुसार नियम निश्चित करण्यात येणार आहे. ज्या दिवशी टेस्ट पहिल्यांदा सुरु होईल, त्याला दिवसाला पूर्ण दिवस समजले जाणार आहे. म्हणजे त्या दिवशी कोणत्याही वेळी टेस्ट सुरु झाली तरी पहिली ओव्हर सुरु होताच तो संपूर्ण दिवस ग्राह्य धरण्यात येणार आहे असे आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment