टेस्ट क्रिकेटमध्ये पहिला बॉल खेळणार नाही’, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने केले जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – येत्या 18 रोजी टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या या लढतीकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. या लढतीमध्ये सर्वांचे लक्ष युवा बॅट्समन शुभनन गिलवर असणार आहे. शुभनन गिलने आपल्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये अनेकांना प्रभावित केले आहे. ऐतिहासिक टेस्ट फायनलमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळेल असा अंदाज क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. साऊथम्पटनचे पिच हे स्विंग बॉलिंगला मदत करणारे असल्याने शुभनन गिलची तिथे कसोटी लागणार आहे. या कसोटीमध्ये शुभनन गिलला न्यूझीलंडचे फास्ट बॉलर ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांचा सामना करावा लागणार आहे. तो या बॉलर्सना कशा पद्धतीने खेळेल यावर टीम इंडियाची सुरुवात अवलंबून असणार आहे.

‘पहिला बॉल खेळणार नाही’
शुभनन गिलने त्याच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये फक्त एकदा पहिल्या बॉलचा सामना केला आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध झालेल्या अहमदाबाद टेस्टमध्ये पहिला बॉल खेळला होता. त्या सामन्यामध्ये जेम्स अँडरसनने त्याला पहिल्याच ओव्हरमध्ये इनस्विंगरवर LBW केले होते. शुभनन गिलला त्या इनिंगमध्ये खातेसुद्धा उघडता आले नव्हते.

त्या इनिंगच्या सुरुवातीला मी स्वत: रोहित शर्माला पहिला बॉल खेळतो, असे सांगितले होते ते मी का केले हे मला माहित नाही. पण त्यावेळी मी तिसऱ्या की चौथ्या बॉलवर शुन्यावर आऊट झालो. त्यामुळे आता पुन्हा असं होणार नाही.” असे शुभनन गिलने ‘द ग्रेड क्रिकेटर शो’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये जाहीर केले आहे.

Leave a Comment