आयपीएल विजेता ‘हा’ कर्णधारच कोणत्याही स्टार खेळाडूविना संघाला बनवू शकतो चॅम्पियन: युसुफ पठाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाणने इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राशी निगडित काही आठवणी आपल्या चाहत्यांसह शेअर केल्या आहेत. आयपीएलच्या पहिल्या तीन सत्रात युसुफ पठाण राजस्थान रॉयल्स संघाचा एक महत्त्वाचा भाग होता. २००८ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सत्रात शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स चॅम्पियन बनला होता.

पहिला हंगाम आठवताना युसुफ पठाण म्हणाला की फक्त शेन वॉर्नच स्टार खेळाडूंशिवाय संघासाठी आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकतो. “शेन वॉर्नच्या नेतृत्वात मी तीन वर्ष आयपीएलमध्ये खेळलो. त्याच्या बर्‍याच आठवणी आहेत.सामान्यापूर्वी तो फलंदाजांना कसे आऊट करायचे याविषयी चांगले मार्गदर्शन करत असे.आम्ही त्याच्या योजनेला प्रत्यक्षात मैदानात उतरवले आणि फलंदाज त्याने सांगितलेल्या प्रकारेच आऊट व्हायचे. “

युसूफने आयपीएलच्या पहिल्या सत्रात ४३५ धावा फटकावल्या आणि ८ विकेट्स घेतल्या. पहिल्या हंगामात यश संपादन केल्यानंतर तो आयपीएलमधील एक मोठा खेळाडू ठरला.पठाण पुढे म्हणाला, “दुर्दैवाने, मी त्याच्या नेतृत्वाखाली तीन वर्षांहून अधिक काळ खेळू शकलो नाही.कोणत्याही मोठ्या खेळाडूशिवाय त्याने आमच्या संघाला अंतिम सामन्यात नेले आणि जेतेपद जिंकवले. त्यावेळी राजस्थान रॉयल्सकडे बरेच स्थानिक खेळाडू होते आणि खूपच कमी आंतरराष्ट्रीय स्टार्स होते.त्याच्यासारखे कर्णधार काही संसाधने नसतानाही जेतेपद जिंकू शकतात. “

राजस्थानमध्ये तीन सीझन घालवल्यानंतर पठाण कोलकाता नाईट रायडर्समध्ये दाखल झाला.युसुफचा केकेआरमधील प्रवासही प्रभावी होता आणि त्याने गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोन आयपीएल विजेतेपद जिंकले.नंतर तो सनरायझर्स हैदराबादमध्ये दाखल झाला.मात्र, गेल्या वर्षीच्या आयपीएल २०२० च्या लिलावात कोणत्याही संघाने त्याला खरेदी करण्यात रस दाखविला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment