पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून

0
124
murder (1)
murder (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | पुण्यातील केस्नंद पेरणे फाटा येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा निर्घुण खून करण्यात आला आहे. चारित्र्याच्या संशयावरून हा खून करण्यात आला. विशेष म्हणजे, लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तिच्या जोडीदारानेच तिचा वायरने गळा आवळून खून केला.

लक्ष्मीनगर, रामनगर झोपडपट्टी रस्ता, पेरणे फाटा, तालुका हवेली येथे राहणाऱ्या भारती उर्फ विशाखा राममूर्ति या 17 वर्षीय मुलीचा खून झाला असून, तिचा जोडीदार सागर सारंगधर वानखेडे, वय सत्तावीस वर्ष राहणार कुंधेगाव, जिल्हा बुलढाणा याला लोणीकंद पोलिसांनी खूनासह इतर गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे.

खून झाल्याची खबर लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व पोलीस निरीक्षक गुन्हे विनायक वेताळ यांना मिळाली. त्यानंतर तपास पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी एक अल्पवयीन मुलगी मृतावस्थेत पडलेली आढळून आली. पोलिसांनी झालेल्या घटनेचा पंचनामा करून, चौकशी सुरू केली. व चौकशी मध्ये त्यांना आरोपी वानखेडे याबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर 302 आणि इतर विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here