धरणात तरंगत होता अनोळखी महिलेचा मृतदेह, आत्महत्या की खून अजून अस्पष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख

पेठ तालूक्यातील इनामबारी धरणात शनिवारी अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. धरणामध्ये डेड बाॅडी तरंगत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलीसांशी सपर्क साधला असता सर्व प्रकार उघड झाला.

हाती आलेल्या माहितीनुसार, पेठ तालुक्यातील पेठ नाशिक मार्गावर इनामबारी धरणात हॉटेल सह्याद्री पासुन जवळच असलेल्या धरणात अनोळखी महिलेचा मृतदेह सकाळी ११ वाजेच्या सुमारास परिसरातील नागरीकांना आढळून आला . या घटनेची खबर पोलीस पाटील भारतीबाई गवळी यांनी पोलीसांना दिली. पोलीसांना पाण्यात मृतावस्थेतील अंदाजे ३० वर्ष वयाची रंगाने गोरी, उंची ५ फुट, अंगावर हिरवट पिवळी रंगाची साडी, हिरव्या रंगाचे ब्लाऊज, हातात लाल रंगाची एकेक बांगडी गळयात मंगळसुत्र तसेच छोटी पर्स, त्यात हजार बाराशे रुपये व १०० / १५० रुपयांची चिल्लर मिळून आली. घटनास्थळापासुन काही अंतरावर काळापट्टा असलेली चप्पल मिळूण आली. या घटनेची उकल पोष्ट मार्टम नंतर होणार असल्याने हा घातपात की आत्महत्या याचा उलगडा होऊ शकणार आहे.

या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन सदर महिले बाबत माहिती देण्याचे आवाहन पेठ पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे.