हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात सध्या कोरोना विषाणूची समस्या सुरु आहे. जगभरातील १ कोटीहून अधिक लोकांना या विषाणूचे संक्रमण झाले आहे. चीनच्या वुहान शहरातून हा विषाणू पसरला आहे. अधिक तपासात हा विषाणू बॅटच्या मांसातून मानवी शरीरात आला असल्याचे समोर आले. जगाच्या दबावामुळे चीनने हे मार्केट बंद केले जिथे बॅट पासून सापपर्यंत सर्व प्रकारचे मांस विकले जात होते. सध्या सोशल मीडियावर आणखी एका माणसाच्या बाजाराची चर्चा होते आहे. हे फोटो भारतातले आहेत, या बाजारात कुत्र्यांपासून माकडापर्यंत मांस विकले जाते. या बाजारात चिकन किंवा मटण नाही तर कुत्रा आणि माकड यांचे मांस विकले जाते.
मणिपूरमधील चूरचंदपूर इथे हा बाजार आहे. या बाजारात हरीण, रानडुक्कर तसेच नामशेष होणाऱ्या पक्ष्यांचे मांस मिळते. सोशल मीडियावर People for the Ethical Treatment of Animals अर्थात पेटा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अगदी खुलेआम जनावरांचे मांस विकले जात आहे. बाजारात ना कुणी मास्क लावला आहे ना कुणी सोशल डिस्टंसिंग पाहायला मिळते आहे. याशिवाय या बाजारात पिंजऱ्यात बंद कुत्री देखील पाहायला मिळत आहेत. लोक चवीने कुत्र्याचे मांस खरेदी करून खात आहेत. नुकतीच नागालँड मध्ये कुत्र्यांच्या मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोरोना पसरलेला असतानाही या बाजारात कुत्र्यांचे मांस विकले जाते आहे. सध्या स्थानिक प्रशासनाने सदरील बाजार बंद केला असल्याचे बोलले जात आहे.
या बाजारात जिवंत मासेही विकले जात आहेत. त्यांना झाकलेदेखील नाही आहे. विकणाऱ्यांनी तर हातात गल्व्हज देखील घातले नाही आहेत. कोरोना संकटात असा बेजबाबदारपणा आणखी अधिक आजार पसरवू शकतो. हळूहळू कोरोना पसरत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या १० लाख पार गेली आहे. भारत आता रुग्णसंख्येत तिसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी चीनच्या वुहानच्या बाजाराची चर्चा झाली होती. तिथे कोणत्याच साफसफाईशिवाय जनावरांचे मांस विकले जात होते. याशिवाय व्हिएतनाम मध्ये देखील बेडकापासून कुत्र्यांचे मांस विकले जात असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. भारतातील या फोटोनंतर आता सरकारने याविरुद्ध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.