कामगारानेच ५१ लाखांच्या मुद्देमालावर मारला डल्ला

विटा पोलिसांच्या डीबी पथकाने अतिशय मोठ्या चपळाईने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बंद बंगल्याच्या छताचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातून १४५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोलेक्स कंपनीचे १ घड्याळ, स्विसकॉर्न कंपनीची २ घड्याळे रोख ३ लाख असा ५१ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या बिराप्पा बन्ने याला विटा पोलिसानी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ३२ लाखाचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.

ठाण्यात ज्वलनशील केमिकल साठ्यावर छापा, २ केमिकल माफियांना अटक  

भिवंडी तालुक्याच्या पुर्णा येथील केमिकल गोदामावर नारपोली पोलिसांनी छापा टाकला. त्यात पोलिसांनी ८ लाख ३५ हजार ९०० रुपये किंमतीचा केमिकल साठा जप्त केला. तसच केमिकल मालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तिर्थराज पाल आणि विरल गंबीया असे अटक केलेल्या केमिकल माफियांची नाव आहेत.

मिरजेत चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा चाकूने भोसकून खून

मिरज येथील रॉकेल डेपो झोपडपट्टी येथे राहणारी विवाहिता सोनम माने हिचा पती राहुल माने याने चारित्र्याच्या संशयावरून रात्री २ वाजण्याच्या सुमारास पत्नीच्या पोटात चाकूने भोसकून खून केला आहे. खून करून पती राहुल माने हा घटनास्थळावरून फरारी झाला आहे. या खूनाची गांधी चौकी पोलिसात नोंद झाली असून पोलिस आरोपी राहुल माने याचा शोध घेत आहेत.

बलात्कारातून मतिमंद मुलगी गर्भवती, ३ महिन्यांनंतर प्रकार उघडकीस

 एका अज्ञात नराधमाने केलेल्या बलात्कारातून मतिमंद मुलगी गर्भवती झाल्याची घटना जामखेड तालुक्यात उघडकीस आली आहे. पीडितेच्या मतिमंदपणाचा फायदा घेत हा अज्ञात नराधम गेल्या काही महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करत होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘ओमराजेंनी भाजप संपवली म्हणून हल्ला केला!’ हल्लाखोर टेकाळेचा ओमराजेंवर आरोप

कळंब तालुक्यामध्ये भाजपला कमी समजलं जातं. ओमराजे निंबाळकर हे जिल्ह्यातून भाजपा संपवण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्यावरील या रागामुळंच मी ओमराजेंवर हा हल्ला केला असा आरोप ओमराजेंवर हल्ला करणाऱ्या अजिंक्य टेकाळेने केला आहे. सोबतच त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला न्याय द्यावा अशी मागणीही केली आहे.

आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी केली दगडफेक

कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक करत त्यांच्या गाडीचीही तोडफोड केल्याची घटना मध्यरात्री घडली. हा हल्ला शिवसेनेकडून करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

अखेर अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊतवर गुन्हा दाखल, महिलांबद्दल केले होते अश्लील भाष्य  

सोलापुरातल्या बार्शीचे माजी आमदार आणि भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत यांनी भाजपचे स्थानिक नेते राजेंद्र मिरगणे यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती. मिरगणे हे युतीधर्म पाळून दिलीप सोपल यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे राऊत संतापले आणि मिरगणेंवर टीका करताना त्यांची जीभ घसरली होती. आणि या सर्वांमध्ये स्वतःला छत्रपती म्हणून ही उल्लेख केला होता, त्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्या होत्या.

पुण्यातील हॉटेल ड्रीमलँडला भीषण आग; बघ्यांची एकच गर्दी

पुणे स्टेशन परिसरातील ड्रीमलँड हॉटेल आगीच्या विळख्यात सापडलं आहे. हॉटेलच्या तिन्ही मजल्यांवर आग पसरली आहे.

धक्कादायक..!! ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ल्याचा प्रयत्न

उस्मानाबादमधील भाजप खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कळंब येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत एका तरुणाकडून चाकू हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी याठिकाणी ही घटना घडली असून हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं आहे.

प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून चौकशी होणार! दाऊदच्या साथीदाराशी आर्थिक व्यवहार प्रकरण

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यावेळी ईडी चौकशीसाठी वर्णी लागली आहे ती राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची. पटेल यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. ईडीच्या कार्यालयात १८ ऑक्टोबरला पटेल यांची चौकशी होणार आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं होतं. त्यामुळं ईडीनं त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.