मालखेड येथे नदीकाठावर मगरीचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना महापुर आला होता. सध्या पाऊस कमी प्रमाणात पडत असल्याने महापूराचे पाणी ओसरु लागले आहे. नदीकाठी पाण्याखाली गेलेल्या शेत जमिनी दिसून लागल्या आहेत. कराड तालुक्यातील मालखेड येथे मंगळवारी सकाळी कृष्णा नदीपात्रालगत शेतात काम करण्यासाठी गेलेल्या लोकांना मगर आढळून आली. सुमारे दहा ते बारा फुट लांबाची मगर या ठिकाणी आढळल्याने शेतकरी, ग्रामस्थांत भितीचे वातवरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील नदायिकतावर असलेल्या शेतजमिनी नदीला पूर आल्यानंतर पाण्याखाली जातात. त्या जमिनी पाण्याखाली गेल्यानंतर अनेक जीवही नदीकाठी येत असतात. सध्या कराड तालुक्यातील कृष्ण व कोयना नद्यांची महापुरामुळे वाढलेली पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. दरम्यान मंगळवारी कराड तालुक्यातील मालखेड येथे सकाळी कृष्णा नदीपात्रालगत काम करण्यासाठी गेलेल्या शेतकरी विलास मारूती पाटील यांना मगरीचे दर्शन झाले.

यानंतर त्यांनी याबाबत ग्रामस्थांना याची माहिती दिल्यानंतर नदीकाठी जय हनुमान पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीनजीक असलेली मगर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मालखेड गावच्या हद्दीत मगरीचे वास्तव्य असल्याने येथील शेतकरी, ग्रामस्थांत भितीचे वातवरण पसरले आहे. त्यामुळे तात्काळ या मगरीला पकडून अन्यत्र हलवावे, अशी मागणी मालखेड, वाठार, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुकसह वाळवा तालुक्यातील कासेगाव, तांबवे, खुबी ग्रामस्थांमधूनही होत आहे. यामुळे या ठिकाणी नदीपात्रात कोणीही जाऊ नये, अशा सूचना स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत.

You might also like