कच्च्या तेलाच्या किंमतीत झाली एका डॉलरपेक्षा जास्त घसरण, काय कारण आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी तेलाच्या किंमती प्रति बॅरल 1 डॉलरपेक्षा जास्तीने घसरल्या. जुलैपासून कच्च्या तेलाची ही सर्वात खालची पातळी आहे. कोरोनाव्हायरस मुळे सर्व देशांतर्गत तेल बाजारात नुकतीच वाढलेली मागणी पुन्हा कमी होत आहे. हे पाहता सौदी अरेबियाने गेल्या पाच महिन्यांत प्रथमच आशिया खंडातील कच्च्या किंमतीत पुन्हा कपात केली आहे. यावर्षी मार्चमध्ये सौदी अरेबियाने आपल्या तेलाची किंमत कमी करुन प्राईस वॉरला सुरुवात केली, त्यानंतर जागतिक पातळीवरील क्रूडची किंमत विक्रमी पातळीवर खाली गेल्याची नोंद झाली.

ट्रेडिंगदरम्यान ब्रेंट क्रूड 2.1 टक्क्यांनी घसरून 41.75 डॉलर प्रति बॅरलवर आला, जो 30 जुलैनंतरची सर्वात नीचांकी पातळी आहे. त्याच वेळी, यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट 2.3 टक्क्यांनी घसरून 38.86 डॉलर प्रति बॅरलवर आला, 10 जुलैपासूनची ही नीचांकी पातळी आहे.

सौदी अरेबियाच्या सरकारी मालकीच्या तेल कंपनी सौदी अरामकोने जूनपासून पहिल्यांदाच आपल्या अरबी लाइट टू एशियाची किंमत प्रति बॅरल 1.4 डॉलरने कमी केली. त्यानंतर, सौदी अरेबियाने वापरलेल्या बेंचमार्कपासून तेलाच्या किंमती 50 सेंटसनी खाली आल्या. एप्रिलमध्ये सौदी अरेबिया, रशिया आणि ओपेक प्लसच्या अन्य सदस्यांमध्ये दररोज सुमारे 10 दशलक्ष बॅरेल तेल उत्पादन कमी करण्याचा करार झाला होता. यानंतर, क्रूडची किंमत पुन्हा वाढवण्यरत आली आणि बेंचमार्क ब्रेंट क्रूडने मार्चनंतरच्या खालच्या पातळीपेक्षा दुप्पट उडी घेतली. परंतु कोरोनामुळे जगभरातील आर्थिक क्रियाकार्यक्रमांवर बंदी आल्यामुळे तेलाची मागणी पुन्हा कमी झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”