नवी दिल्ली । बुधवार, 6 एप्रिल रोजी सकाळी 9:44 पर्यंत क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये 3.78% ची घसरण झाली. गेल्या 24 तासात ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप $2.08 ट्रिलियन पर्यंत घसरले आहे. Bitcoin आणि Ethereum या दोन्ही प्रमुख करन्सीमध्ये घसरण झाली आहे. एलन मस्कने ट्विटरमधील स्टेक आणि ट्विटरच्या बोर्डावर सदस्यत्व विकत घेतल्याच्या बातम्यांनंतर Dogecoin (DOGE) मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
स्पेसएक्स आणि टेस्लाचे सह-संस्थापक एलन मस्क आता ट्विटरच्या बोर्डाचे सदस्य असतील. एलन मस्क हे क्रिप्टोकरन्सी Dogecoin ची जाहिरात बऱ्याच काळापासून करत आहेत. त्यांच्या ट्विटनंतर अनेकदा या करन्सीमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी, Dogecoin ची किंमत 7.09% वाढली आहे.
Coinmarketcap कडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ही बातमी लिहिताना, Bitcoin 3.16% घसरून $45,206.44 वर ट्रेड करत आहे, तर Ethereum ची किंमत त्याच कालावधीत $3,342.43 वर 4.38% खाली आहे. हे लिहिताना, Bitcoin चे मार्केट वर्चस्व 41.2% आहे, तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 19.3% आहे.
कोणत्या कॉईनमध्ये किती बदल झाला ?
-Dogecoin – DOGE – प्राइस: $0.1606, वाढ : +7.09%
-Terra – LUNA – प्राइस: $117.10, वाढ : +0.68%
-XRP – प्राइस: $0.8092, घसरण : -2.22%
-Shiba Inu – प्राइस: $0.00002599, घसरण : -2.67%
-BNB – प्राइस: $440.53, घसरण : -3.38%
-Cardano – ADA – प्राइस: $1.14, घसरण : -5.96%
-Solana – SOL – प्राइस: $123.92, घसरण : -7.21%
-Avalanche – प्राइस: $89.24, घसरण : -7.62%
सर्वाधिक वाढ झालेलं कॉईन
Charactbit (CHB), Shisha (SHISH) आणि Shiba Hunter (FALQOM) हे गेल्या 24 तासांत टॉप गेनर्समध्ये होते. Charactbit (CHB) गेल्या 24 तासांत 789.32% वधारले आहे, तर Shisha (SISH) नावाचे कॉईन 365.17% पर्यंत वाढले आहे. याशिवाय Shiba Hunter (FALQOM) मध्ये 239.52% वाढ झाली आहे.