Tuesday, February 7, 2023

चेन्नईच्या 3 सदस्यांना कोरोनाची लागण; आयपीएल संकटात

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल वर कोरोनाचे संकट आले आहे. कोलकाता नाईट रायडर्स चे 3 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडले असताना आता महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स च्या तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. यापैकी एकही खेळाडू नाही.

ईएसपीएन क्रिकइन्फोनं’ दिलेल्या वृत्तानुसार चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन (Kasi Viswanathan), बॉलिंग कोच (L Balaji)आणि टीमच्या बसमधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. चेन्नईची टीम सध्या दिल्लीमध्ये आहे. या टीममधील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी रविवारी झालेल्या टेस्टमध्ये निगेटीव्ह आढळली आहे.

- Advertisement -

दरम्यान यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर  या दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे  कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सोमवारी होणारी मॅच अखेर स्थगित करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.