नाशिकमध्ये ३१ मार्चपर्यंत चलनी नोटांची छपाई बंद; नोट प्रेसचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा संसर्गा टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत चलनी नोटा छपाई बंद करण्याचा निर्णय नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस या दोन्ही प्रेसने घेतला आहे. इतिहासात पहिल्यांदाच नोटा छपाई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मजदूर संघ आणि कंपनी व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.

नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये १०,२०,५०,२०० आणि ५०० रुपयांच्या चलनी नोटा रोज छापल्या जातात. मात्र, ३१ मार्चपर्यंत या सर्व चलनी नोटांची छपाई बंद राहणार आहे. या व्यतिरिक्त नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये छापले जाणारे पासपोर्ट, विविध प्रकारे चेक, मुद्रांक, स्टॅम्प्स यांची सुद्धा छपाई बंद राहणार आहे. सरकारने संचारबंदी वाढवल्यास नाशिकची इंडिया सिक्युरिटी प्रेस चलनी नोटा छपाई आणखी काही काळ बंद करण्याचा निर्णय प्रेस घेऊ शकते.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment