महाबळेश्वरात कोरोनाच्या औषध खरेदीत लाखोंचा घोटाळा ; नगराध्याक्ष व तात्कालीन मुख्याअधिकारीसह चैाकशीची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनीधी : महाराष्ट्राच नंदनवन म्हणुन ओळख असणार्या महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालीकेत कोव्हीड १९ साथरोगाच्या काळात केल्या गेलेल्या औषध खरेदीत .लाखोचा निधी हडप केला गेला असल्याचा खळबळजनक आरोप पालिकेचे माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे जेष्ठ नेते डि एम बावळेकर यांनी केला आहे .महाबळेश्वर नगरपालकेकडुन कोरोनात औषधासाठी नगरपालूकेकडुन खर्ची केला असल्याचे सांगितले जात असताना .माहीतीच्या अधिकारात मिळालेल्या खळबळजनक माहीती वरुन कोटी रुपायाचा निधी नगराध्यक्षानसह तात्कालीन मुख्याअधिकारी व इतर सहकार्यानी यांत चांगलाच माल चापला असल्याचे उघड झाले आहे .यातच माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांनी महाबळेश्वरच्या जनतेचा हक्काचा निधी कोणी कणी खाल्ला त्याची चैाकशी करुन कारवाई करावी अशी जिल्हाअधिकाराच्याकडे केली आहे.

दरम्यान महाबळेश्वर नगरपालीकेला आलेल्या शासकीय नीधी व खर्च केलेल्या बाबीचा तपशील पाहता . महाबळेश्वर नगरपालीकेला फक्त १ लाख शासकीय निधी प्राप्त झाला आहे . तर महाबळेश्वर नगरपालीकेकडुन कोरोना साथरोगात २ कोटी ९१ लाख औषधे खरेदी केली असल्याची खळबळजनक माहीती समोर आली आहे .शासकीय मिळालेल्या निधीतुन फक्त १ हजार मास्क नगरपालिकेने खरेदी केली असल्याची माहीती दिली आहे . कोव्हीड १९ यासंसर्ग रोगा विरोधात लढताना मास्क व सॅनिटायझर ही दोन प्रमुख हात्यारे असने महत्वाचे आहे . महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेने रोगापेक्षा इलाज भयंकर झाला आहे.

महाबळेश्वर गिरीस्थीन नगरपरीषदला कोव्हीड १९ साथरोगात किती शासकीय निधी आला याबाबत माहीती मागितली असता गिरीस्थान नगरपरीषद महाबळेश्वरला १ लाख रुपायाचा निधी आला आहे . यानिधीमध्ये १००० मास्क व ५ लीटरचे दोन डेंटाॅल लिक्वीडचे कॅड घेतले असल्याची माहीती नगरपालीकेकडुन देण्यात आली आहे . महाबळेश्वर नगरपालीकेने मास्क व सॅनिटायझर मात्र शासकीय निधीतुन खरेदी केले . तर महाबळेश्वर नगरपालीकडुन कोव्हीड १९ साथरोगादरम्यान जी औषधे खरेदी केली त्याची आकडेवारी २कोटी ९१ लाख रुपायाची आहे .एस आर बी इडस्ट्रीज सोलापुर कडुन कडुन खरेदी केली आहेत . अशी धक्कादायक माहीती सुद्धा समोर आली आहे.

सर्वसामान्यांना मास्क व सॅनिटायझर फक्त हजारात मात्र निर्जननतिकरणाची औषधे मात्र कोटींत .”जखम माडीला औषध शेडीला “ असा काही प्रकार महाबळेश्वर नगरपालीकेत घडला असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे . महाबळेश्वर शहरात आजपर्यंत २४६ पाॅजुचीव्ह रुग्न आढळला आहेत .शहरात कोरोनाचा आकडा २४६ असताना नगरपालिकेने फक्त १००० मास्क शासकीय अनुदानीतुन खरेदी केले . मात्र महाबळेश्वर शहराची लोकसंख्या अंदाजे २० हजार आहे . महाबळेश्वर नगरपालिकेने कोटी रुपायात औषध खरेदी केली .त्या औषधाचा वापर खरच कोरोना विरोधात फलदायक होता का ? सर्वसामान्याना याचा काय फायदा झाला . हे सगळा संशोधनाचा विषय आहे महाबळेश्वरनगरपालीकेत रोगा पेक्षा इलाज भयकंर ही गोष्ट लपुन राहीली नाही.

महाबळेश्वर नगरपालीकेच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे , नगरसेवक कुमार शिंदे , व तात्कालीन मुख्याअधिकारी अमिता दगडे पाटील यांनी कोरोना साथरोगात कोट्यावधी रुपायाची औषधे खरेदी करुन शंका निर्माण करत जनतेच्या पैशाचा अपव्यय केला आहे . कोरोनावर ज्या औषधाचा कोणताही वापर होत नाही अशी बोगस औषध खरेदीत २ कोटी ९१ लाख रुपयाची खरेदीत घोटाळा आहे . सबधिताची सखोल चैाकशी करुन कारवाई

माजी नगराध्यक्ष
डी एम बावळेकर

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment