Cyber Fraud : ‘या’ 5 अँड्रॉइड अ‍ॅप्स पासून सावध राहा, अन्यथा बँक खाते होऊ शकेल हॅक

Cyber Fraud
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cyber Fraud: जर आपण अँड्रॉइड फोन वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची ठरेल. कारण आज आपण बँकिंगसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या अँड्रॉइड अ‍ॅप्स बाबत माहिती जाणून घेणार आहोत. हे लक्षात घ्या कि, नेदरलँडच्या एका फर्मने नुकतेच आपल्या रिपोर्टमध्ये काही अँड्रॉइड अ‍ॅप्सची माहिती दिली आहे, जे त्यांच्या अ‍ॅपद्वारे अँड्रॉईड डिव्हाइसेसमध्ये ट्रोजन व्हायरस इन्स्टॉल करत आहेत. याद्वारे युझर्सचे लॉगिन डिटेल्स, खाते क्रमांक आणि इतर आर्थिक माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे. जर आपल्या फोनमध्येही असे अ‍ॅप्स असतील तर ते लगेचच आपल्या फोनमधून डिलीट करावेत.

How to hack a phone: 7 common attack methods explained | CSO Online

या देशांमध्ये पसरतोय ट्रोजन व्हायरस

नेदरलँडमधील या कॉम्प्युटर सपोर्ट फर्मचे नाव Threat Fabric आहे. या रिसर्चरने आपल्या रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की अँड्रॉइड बँकिंग ट्रोजन डिस्ट्रीब्यूट करण्याची ही पद्धत अत्यंत धोकादायक आहे. कारण युझर्सना याबाबतची माहिती कळेपर्यंत त्यांचे बँकिंग आणि पर्सनल डिटेल्स हॅकर्सपर्यंत पोहोचले जातात. या रिपोर्टनुसार, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, पोलंड, स्पेन आणि इटली यांसारख्या देशांमध्येही या ट्रोजनचे डिस्ट्रीब्यूशन वाढले आहे. हे लक्षात घ्या कि, असे अशा ट्रोजन अ‍ॅप्स पटकन ओळखणे जरा अवघड आहे. Cyber Fraud

What is a Trojan and how can you protect your healthcare business? - Paubox

या अ‍ॅप्समध्ये सापडला धोकादायक ट्रोजन व्हायरस

या कॉम्प्युटर सपोर्ट फर्मने हे पाच अँड्रॉइड अ‍ॅप्स तात्काळ डिव्हाईसमधून काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये My Finances Tracker, File Manager Small, Lite, Zetter Authentication, Codice Fiscale 2022 आणि Recover Audio, Images & Videos सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. जर आपल्या फोनमध्ये यापैकी कोणतेही अ‍ॅप असेल तर ते त्वरित डिलीट करा. Cyber Fraud

Targeted Virus Attacks

‘या’ 17 अँड्रॉइड अ‍ॅप्समध्ये आढळला धोकादायक व्हायरस

अलीकडेच, मालवेअर एनालिस्ट्सना Google Play Store वर डझनभर व्हायरस अ‍ॅप्स आढळले आहेत. यामध्ये मुख्यतः अ‍ॅडवेअर ट्रोजन मालवेअर. यासोबतच स्कॅमर्सद्वारे वापरण्यात येणारे बनावट अ‍ॅप्स आणि प्रायव्हसी डेटाला टार्गेट करणारे आणि डेटा चोरणारे इतर अ‍ॅप्सही सापडले आहेत. हे अ‍ॅडवेअर ट्रोजन 9.89 मीलियनपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले होते. या अ‍ॅप्समध्ये इमेज-एडिटिंग सॉफ्टवेअर, व्हर्च्युअल कीबोर्ड, सिस्टम टूल्स आणि युटिलिटीज, कॉलिंग अ‍ॅप्स, वॉलपेपर कलेक्शन यासारख्या अ‍ॅप्सचाही समावेश आहे. Cyber Fraud

Cyber Fraud विषयीच्या तक्रारीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://cybercrime.gov.in/Webform/Helpline.aspx

हे पण वाचा :
5G Smartphones : भारतात विकले जाणारे ‘हे’ 5 स्वस्त 5G स्मार्टफोन, फीचर्स अन् किंमत जाणून घ्या
LIC च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा 1 लाख रुपयांपर्यंतची पेन्शन !!!
Multibagger Stock : 1 वर्षात 100% पेक्षा जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल
FD Rates : ‘या’ 4 बँकांच्या FD वर मिळते आहे 7% पेक्षा जास्त व्याज
गेल्या 20 वर्षात ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये !!!