व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

म्हासुर्णे सोसायटीच्या चेअरमनपदी दादासो कदम तर व्हा. चेअरमनपदी प्रदिप माने बिनविरोध

पुसेसावळी | खटाव तालुक्यातील म्हासुर्णे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी दादासो कदम तर व्हा.चेअरमन प्रदिप प्रताप माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित संचालक राजाराम माने, गोरख माने, रामचंद्र माने, चंद्रकांत माने, अधिक सदाशिव माने, अधिक शिवाजी माने, दिपक यमगर, रविंद्र सरकाळे, जगन वायदंडे, अर्चना निकम, कांताबाई माने यांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आमच्यावर सभासदांनी दिलेला विश्वास सार्थ ठरवत संस्थेचे व सभासदांचे हित जोपासले जाईल अशी ग्वाही दिली. निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील माळी व संस्थेचे सचिव उत्तम सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली,

यावेळी नूतन पदाधिकार्‍यांचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार व सातारा जिल्हा बॅकेचे संचालक प्रभाकर घार्गे, जिल्हा बॅकेचे संचालक प्रदिप विधाते, जितेंद्र पवार, नंदकुमार मोरे, सी.एम पाटील, सचिन माने (सरपंच), महादेव माने, किसन माने, राजाराम माने, पांडुरंग माने, विलास शिंदे, सुरेश शिंदे, भाऊसो लादे आदींनी अभिनंदन केले.