दहिवडी नगरपंचायत : नगराध्यक्षपदी सागर पोळ तर उपनगराध्यक्षपदी राजेंद्र साळुंखे बिनविरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या दहिवडीच्या नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. दिवंगत वाघोजीराव पोळ यांचे नातू राष्ट्रवादीचे नेते सागर पोळ यांची नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी राजेंद्र साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली.

दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पीठासीन अधिकारी प्रांतआधिकारी शैलेश सुर्यवंशी, मुख्याधिकारी अवधुत कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नुतन नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र सांळुखे निलीमा पोळ, विशाल पोळ, सुरेंद्र मोरे, मोनिका गुंडगे, वर्षाराणी सावंत, सुप्रिया जाधव, महेश जाधव, विजया जाधव, शैलेंद्र खरात उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, सरचिटणीस अभय जगताप, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष विक्रम शिंगाडे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, सुनिल पोळ, बाबा पवार, तानाजी मगर, दादासाहेब चोपडे, बाळासो गुंडगे, तानाजी जाधव, दादा जाधव, रामभाऊ पोळ, शामराव नाळे, पतंगराव जाधव, लालासो ढवाण, संजय जाधव, शामराव पोळ, महेश कदम उपस्थित होते.