Friday, June 2, 2023

भ्रष्ट्राचाराची प्रकरणे उघड होत असल्याने संजय राऊतांची कोल्हेकुई सुरू; आशिष शेलारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भ्रष्ट्राचार ची प्रकरणे उघड होत असल्याने संजय राऊत यांची कोल्हेकुई सुरू झाली आहे अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय कलगीतुरा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आशिष शेलार म्हणाले, संजय राऊत हे एकाकी पडले आहेत. त्यामुळेच त्यांची आदळआपट होत आहे. भ्रष्ट्राचार ची प्रकरणे उघड होत असल्याने संजय राऊत यांची कोल्हेकुई सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील एकही नेता त्यांच्या बरोबर नाही. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोदीत ते जाऊन बसतात त्यांचेही सर्वोच्च नेते याबाबत काही बोलले नाहीत.

संजय राऊतांनी निःपक्षपातीपणावरून केलेल्या वक्तव्यावर देखील शेलारांनी प्रतिक्रिया दिली. ज्या माणसाला स्वतःचा पक्ष माहिती नाही, त्यांनी असे विधान करू नये. त्यांनी पक्ष निःपक्षपातीपणाची भाषा बोलू नये. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करणे हे निःपक्षपातीपणा होता का? नितेश राणा आणि आमदार राणा यांच्यावर दाखल केलेला गुन्हा निःपक्षपातीपणा आहे का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला.