हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI Transaction Limit : आजकाल लोकांकडून कॅश ऐवजी UPI द्वारे पैसे देण्याचे प्रमाण वाढले आहे. जर आपणही UPI द्वारे पेमेंट करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. मात्र आपल्या बँकेकडून यासारख्या ट्रान्सझॅक्शनसाठी लिमिट घातली जातेयाची आपल्याला माहीती आहे का??? हे लक्षात घ्या कि, UPI App द्वारे आपल्याला फक्त एका लिमिटपर्यंतच पेमेंट करता येते. UPI ट्रान्सझॅक्शनसाठी प्रत्येक बँकेकडून डेली लिमिट दिली गेली आहे. याचा अर्थ असा की, आता आपल्याला एका दिवसात ठराविक रकमेपर्यंतच पैसे पाठवता अथवा मिळवता येतील.
NPCI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आपल्या UPI द्वारे एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंतचे ट्रान्सझॅक्शनच करता येतील. मात्र प्रत्येक बँकेनुसार हे लिमिट बदलू शकते. उदाहरणार्थ कॅनरा बँकेचे डेली लिमिट फक्त 25,000 रुपये तर SBI चे डेली लिमिट 1 लाख रुपये आहे.
ट्रान्सझॅक्शन लिमिट किती असेल ???
मनी ट्रान्सफर करण्याच्या लिमिटसोबतच UPI ट्रान्सफरसाठी देखील डेली लिमिट देण्यात आले आहे. तसे पहिले तर डेली UPI ट्रान्सफर लिमिट 20 ट्रान्सझॅक्शन सेट केले गेले आहे. मात्र, प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळे लिमिट असू शकेल. मात्र एकदा लिमिट संपल्यानंतर, पुन्हा लिमिट रिन्यू होण्यासाठी 24 तास वाट पहावी लागेल. UPI Transaction Limit
PhonePe द्वारे UPI ट्रान्सझॅक्शन लिमिट जाणून घ्या
PhonePe ने UPI द्वारे एका दिवसांत जास्तीत जास्त 1 लाख रुपयांची लिमिट देखील निश्चित केली आहे. ज्यामध्ये आता कोणालाही या अॅपद्वारे एका दिवसात जास्तीत जास्त 10 किंवा 20 ट्रान्सझॅक्शन करता येईल. हे लक्षात घ्या कि, PhonePe ने प्रति तास ट्रान्सझॅक्शन लिमिट निश्चित केलेली नाही. UPI Transaction Limit
Amazon Pay द्वारे UPI ट्रान्सझॅक्शन लिमिट जाणून घ्या
Amazon Pay ने UPI द्वारे एका दिवसांत पेमेंट करण्यासाठी 1 लाख रुपयांची लिमिट निश्चित केली आहे. त्याच वेळी, त्यांनी डेली 20 ट्रान्सझॅक्शनची लिमिट ठेवली आहे. Amazon Pay ने UPI वर रजिस्ट्रेशन केल्यानंतर नवीन युझर्ससाठी पहिल्या 24 तासात 5,000 रुपयांचे ट्रान्सझॅक्शन लिमिट निश्चित केले आहे. UPI Transaction Limit
Paytm द्वारे UPI ट्रान्सझॅक्शन लिमिट जाणून घ्या
Paytm च्या ग्राहकांसाठी डेली 1 लाख रुपयांची UPI लिमिट निश्चित करण्यात आली आहे. दुसरीकडे, आता Paytm द्वारे एका तासात फक्त 20,000 रुपयांचे ट्रान्सझॅक्शन करू शकाल. या अॅपद्वारे एका तासात 5 ट्रान्सझॅक्शन आणि दिवसातून फक्त 20 ट्रान्सझॅक्शनच करता येतील. UPI Transaction Limit
Google Pay द्वारे UPI ट्रान्सझॅक्शन लिमिट जाणून घ्या
Google Pay ने एका दिवसात जास्तीत जास्त ट्रान्सझॅक्शन लिमिट 10 निश्चित केली आहे. याद्वारे ग्राहकांना एका दिवसात फक्त 10 ट्रान्सझॅक्शनच करता येतील. त्याच वेळी, या अॅपद्वारे एका दिवसात एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर केली जाऊ शकते. मात्र, Google Pay ने दर तासाला ट्रान्सझॅक्शनसाठी कोणतेही लिमिट सेट केलेले नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.npci.org.in/
हे पण वाचा :
PAN-Aadhaar Link : 31 मार्चपर्यंत ‘हे’ काम करा अन्यथा पॅन कार्ड होईल निष्क्रिय
Bank of Baroda कडून ग्राहकांना धक्का, MCLR वाढल्याने आता द्यावा लागणार जास्त EMI
Kotak Mahindra Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा
आपला Income Tax Return भरला गेला आहे की नाही, अशा प्रकारे जाणून घ्या
Home Loan : आता ग्राहकांना पुन्हा बसणार महागड्या कर्जाचा फटका, अनेक बँकांनी व्याजदरात केली वाढ