हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिके वरून कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या विषाणूची गंभीर दखल घेत केंद्रीय आरोग्य विभागाकडून परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आज नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
काय आहेत हे नियम-
नव्या नियमावलीनुसार परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांजवळ 72 तासांच्या आतील कोरोना निगेटीव्हचे प्रमाणपत्र आसणे आवश्यक आहे.
ज्या देशामध्ये कोरोनाचा धोका कमी आहे, अशा नागरिकांची रॅंडम पद्धतीने कोरोना चाचणी करण्यात येईल
कोरोना चाचणी झाल्यानंतर जर संबंधित व्यक्तीचा रिपोर्ट हा पॉझिटीव्ह आला तर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल
परदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सात दिवसांसाठी होम क्वॉरंटाईनची सक्ती करण्यात आली आहे. होम क्वॉरंटाईचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा आठव्या दिवशी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. योग्य सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, घराच्या बाहेर पडताना मास्क घालावे, घरी आल्यानंतर नियमित स्वच्छ हात धुवावेत अशा सूचना देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत