नात्याला काळीमा ! मेहुण्यानेच केला सालीवर अत्याचार

औरंगाबाद – विवाहित लहान सालीवर अत्याचार करणाऱ्या मेहुण्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपीला रविवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेमुळे मेहुणा आणि सालीच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे.

हद्दीतील मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या रहिवासी २२ वर्षीय विवाहितेचा पती शेंद्रा येथील कंपनीत नोकरीला आहे. तिच्यावर मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचा डोळा होता. तिचा नवरा कंपनीत कामाला गेल्याची संधी साधत दोन दिवसांपूर्वी मेहुणा तिच्या घरी गेला. मेहुणीस तू मला खूप आवडते, असे म्हणत बळजबरी केली. या घटनेची वाच्यता तुझ्यासह नवऱ्याला ठार मारण्याची धमकीही त्याने दिली.

विवाहितेने घडलेला प्रकार पतीला सांगितल्यानंतर केल्यास मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदविला.