शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला ठणकावले

eknath shinde uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला ठणकावले आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्धव कदम यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकार परिषदते बोलताना, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली.

शिवसेनेनं २२ ऑगस्टला मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला होता, परंतु शिवसेनेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं शिंदे गटही दसरा मेळावा घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना विचारलं असता दसरा मेळावा हा आमचा म्हणजेच शिवसेनेचाच होणार, कोणी कितीही संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करत असेल तर करुद्या. शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसरा मेळाव्यासाठी येण्याची तयारी सुरु केली आहे महापालिकेचा तांत्रिक मांत्रिक भाग काय असेल तो असेल. पण शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला ठणकावले आहे.

दरम्यान, उद्धव कदम यांच्या शिवसेना प्रवेशावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. साधारणत: सत्ताधारी पक्षाकडे प्रवेशासाठी रांग लागते. पण पहिल्यांदाच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसत आहेत. कारण गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना नाही, याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेत येत आहेत या गोष्टीचा मला अभिमान आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.