Friday, January 27, 2023

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; या दिग्गज खेळाडूने आयपीएल मधून घेतली विश्रांती

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या दमदार कामगिरीमुळे चाहत्यांचे मन जिंकले आहे. परंतु अशातच दिल्लीच्या संघाला एक जबर धक्का बसला आहे. दिग्गज फिरकीपटू रवीश्चंद्रन अश्विनने अचानकपणे आयपीएल मधून माघार घेतली आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच कारण त्याने यावेळी दिले.

अश्विनने ट्विट केले आहे की ‘यावर्षीच्या आयपीएलमधून उद्यापासून (२६ एप्रिल) मी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझे कुटुंब आणि विस्तारित कुटुंब कोविड-१९ विरुद्ध लढा देत आहे. आणि मला या कठीण काळात त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. जर गोष्टी योग्य दिशेने गेल्या तर मी खेळायला परत येण्याची अपेक्षा करतो. धन्यवाद.’

- Advertisement -

‘मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो की हा विषाणू कोणालाही सोडत नाही‌. मी या लढाईत तुमच्या सोबत आहे. कोणाला काही मदत हवी असल्यास मला सांगा. माझ्या परीने होईल तशी मदत करण्याचा मी प्रयत्न करेल.’ असेही अश्विन म्हणाला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.