अमरावती : शहरातील राजापेठ पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या रुक्मिणीनगर परिसरातील नाल्यात एका ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु राजापेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी महिलेची ओळख पटवून तिच्या नातेवाईकांना माहिती दिली. ताजो बी ६५ वर्षीय नूरखाँ राहणार कब्रस्तान जवळ अमरावती असे मृतक महिलेचे नाव आहे.
फ्रेजरपुरा पोलिसात सदर महिला ही मानसिक रोगी असल्याची तक्रार दाखल होती. गुरुवारी रूख्मिनी नगर परिसरातील नाल्यांमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.
राजापेठ परिसरातील नगरसेवक यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत महिलेचा मृतदेह बाहेर काढला व अमरावती जिल्हा सामान्य उपचाराकरता रुग्णालयात पाठविला.
सदर महिला ही मानसिक रोगी असून याच परिसरात बुधवारपासून फिरत होती. राजापेठ पोलिसांनी याबाबत सर्व ठाण्यांना माहिती दिली. पोलिसांनी मृतक महिला हिला ओळखले. तिच्या नातेवाईकांनी बुधवारी सदर महिला ही घरातून गायब असल्याची तक्रार दिली होती.
महिलेची ओळख पटताच पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना माहिती दिली. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास राजापेठ पोलिस स्टेशन सुरू आहे .