चिंताजनक!! औरंगाबाद जिल्ह्यात मृत्यूचा आलेख वाढला ; बरे होण्याचे प्रमाण घटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद: जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असतानाच दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अलीकडे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाली आहे. जानेवारी दरम्यान शहरात कोरोनाचा रिकव्हरी रेट 95 ते 96 टक्के होता. मात्र मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. मृत्यू दरही वाढला आहे. त्यामुळे तब्बल सात टक्‍क्‍यांनी घटून 88.431 टक्क्यावर आला आहे.

फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. बघता-बघता पंधरा दिवसात कोरोना संसर्गाची साखळी शहरभरात पसरली आहे. दिवसो दिवस ही साखळी अधिक घट्ट होत असून तिला ब्रेक लावण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेने समोर आहे. संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी प्रशासनाने 11 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अंशतः लॉक डाऊन लागू केला आहे.

या काळात प्रत्येक शनिवारी व रविवारी आठवड्यातून दोन दिवस शंभर टक्के लॉक डाऊन पाळला जाणार आहे. या पार्श्वभूमीवरच गुरुवारी 11 मार्च रोजी जिल्ह्यात तब्बल 902 रुग्ण निघाले. हा आजवरचा सर्वाधिक कोरोना रुग्णाचा आकडा मानला जात आहे. विशेष म्हणजे याच 679 रुग्ण हे केवळ शहरातीलच आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment