रोहित संघात नसेल तर माझा टीव्ही बंद राहील ; विराटच्या निर्णयावरून सेहवागने व्यक्त केली नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुध्दच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. यादरम्यान अनेक दिग्गज खेळाडूनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने रोहित शर्माला अंतिम संघात स्थान न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

क्रिकबझशी बोलताना सहवाग म्हणाला, “विराट म्हणाला की रोहित शर्मा पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये खेळणार नाही, पण जर भारत हरला तर ही रणनीती कायम राहील का? पराभवामुळे संघावर खूप फरक पडतो. मी कर्णधार असतो तर मी माझा सर्वोत्कृष्ट संघ मैदानात उतरवला असता

रोहित शर्मा उपलब्ध असल्यास मी त्याला मैदानात उतरवणारच. प्रेक्षक रोहित सारख्या खेळाडूंना पाहण्यासाठी येतात. मी स्वतः त्याचा चाहता आहे. जर तो खेळला नाही तर माझा टीव्ही बंद राहील. असेही सेहवाग म्हणाला.

You might also like