हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील मोठे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. अंबानी कुटुंबाच्या ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या लँड लाइन क्रमांकावर हा धमकीचा फोन आला. एका अनोळखी व्यक्तीने या फोन वरून रिलायन्स हॉस्पिटल उडवून देऊ अशी धमकी दिली आली.
A call was received on the landline number of Sir HN Reliance Foundation Hospital at 12.57pm today from an unknown number in which the caller threatened to blow up the Hospital and issued threats in name of some members of the Ambani family: Mumbai Police pic.twitter.com/6LwL14l27A
— ANI (@ANI) October 5, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाइन नंबरवर आलेल्या कॉलवर एका अज्ञात व्यक्तीने हॉस्पिटल उडवून देण्याची आणि अंबानी कुटुंबातील काही सदस्यांच्या नावाने धमकी दिली आहे. डीबी मार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येत आहे. याप्रकरणी सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या धमकीनंतर अंबानींचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया या ठिकाणी पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे यापूर्वीही अंबानींच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या डिस्प्ले क्रमांकावर असे 8 धमकीचे फोन कॉल्स आले होते. फोन करणाऱ्याने अंबानींचे संपूर्ण कुटुंब अवघ्या २४ तासांत उद्ध्वस्त केले जाईल, अशी धमकी दिली होती. याशिवाय 2021 मध्येही मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर 20 जिलेटिनच्या काड्या असलेली एक कारही जप्त करण्यात आली होती.