हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने धमकीचे तीन फोन (Threat Call) आले आहेत. या धमकीच्या फोन नंतर त्यांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
आज सकाळपासून धमकीचे तीन फोन येऊन गेले आहेत. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं (Dawood Ibrahim) नाव घेण्यात आलं आहे तसेच 2 कोटींची खंडणी सुद्धा मागण्यात आली आहे. सकाळी 11:29 वाजता, 11:35 वाजता आणि 12:32 वाजता असे तीन वेळेला हे धमकीचे फोन आले. त्यामुळे गडकरींच्या नागपूर येथहिल कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
BIG NEWS
पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रवाशांमध्ये खळबळ
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/6zC87OXWDb#Hellomaharashtra #Pune
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) January 14, 2023
दरम्यान, धमकीच्या या कॉलनंतर पोलिसांनी तात्काळ गडकरींच्या कार्यालयाकडे धाव घेतली आहे. धमकीचा फोन नेमका कोणी केला आणि कुठून हा कॉल आला कि कोणी जाणूनबुजून खोडसाळपणा करत आहेत का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. मुख्य म्हणजे सध्या नितीन गडकरी सुद्धा हे नागपूरमध्येच आहे. त्यामुळे त्यांचे कार्यालय आणि निवासस्थानाच्या बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.