हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत मंगळवार, दि. १० मार्च २०२० पर्यंत राज्यातल्या १७ लाख ३२ हजार ८३३ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११०६९.१५ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
दरम्यान महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी 24 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आली होती. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे.
एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील 34 लाख 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली. त्यापैकी 68 गावातली यादी जाहीर करण्यात आली होती. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जात आहे. जिल्हा पातळींवर कर्जमाफीचं काम सुरु झालं आहे.