सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कमी पाऊस व धरणात येणाऱ्या पाण्याची कमी झालेली आवक यामुळे कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे उघडुन पाणी विसर्ग करण्याच्या निर्णयास धरण व्यवस्थापनाने स्थगिती दिली असुन धरणाच्या पायथा वीजगृहातुन 2100 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु केला आहे.
105 tmc साठवण क्षमतेच्या कोयना धरणात 82.75 tmc पाणीसाठा झाला असुन धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी आज पायथा वीजगृहासह धरणाचे सहा वक्री दरवाजे 9 इंचाने उचलुन पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता
मात्र कोयना पाणलोट क्षेत्रात कमी झालेला पाऊस व धरणात होणारी पाणी आवक पाहुन धरणाचे दरवाजे न उघडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला. पायथा वीजगृहातुन 2100 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु केला असुन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in