हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. पवारांवर केलेल्या आरोपानंतर आता केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार यांच्याबाबत मी कोणतंही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. समजा मी काय बोललो असलो तर मी दिलगिरी व्यक्त करतो. त्याबाबत मी पवार साहेबांच्या घरी जाऊन माफी मागेन,” असे केसरकर यांनी म्हंटले आहे.
दीपक केसरकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मी शिंदे गटाचा प्रवक्ता आहे. नेत्यांवर निष्ठा आहे आणि ठेवावी. आमचं याच्यापुढे महाराष्ट्राच्या हिताचं बोलण असेल. मी कायम माझी भूमिका मांडत राहिलो आहे. त्यामुळे प्रत्येकाला मर्यादा असतात. शरद पवार हे महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत.
शरद पवारांवर केसरकरांनी काय केले होते आरोप?
दीपक केसरकरांनी पवारांवर केलेल्या आरोपात म्हंटले होते की,”आतापर्यंत जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात होता. राष्ट्रवादी कडून शिवसेनेला संपवण्याचे कारस्थान सुरु आहे.”