वाद अन् मानापमान बाजूला ठेऊन शिंदे-ठाकरेंनी एकत्र यावं : दीपाली सय्यद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटणार असल्याचे ट्वीट शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केले होते. त्यानंतर सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. “मी दोन्ही नेत्यांना भेटले. त्यांच्या बोलण्यातून मला जे जाणवलं तेच मी ट्विटमध्ये मांडलं आहे. मी जी भावना मांडली आहे ती दोन्ही गटाच्या आमदारांची, शिवसैनिकांची आहे. त्यामुळे वाद अन् मानापमान बाजूला ठेऊन शिंदे-ठाकरेंनी एकत्र यावं. त्यांना एकत्रित आणण्यासाठी संजय राऊतांनी पुढाकार घ्यावा,” असे सय्यद यांनी म्हंटले.

दिपाली सय्यद यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, माझ्या मनात असणारी इच्छा मी ट्विटद्वारे व्यक्त केली आहे. शिवसेना खूप मोठी संघटना आहे. मात्र, त्यामध्ये जे दोन गट पडले आहेत. ते मला नको आहेत. त्यामुळे मी पूर्ण शिवसेना गट एकत्रित यावा यासाठी मध्यस्थी घेतली आहे. कुठेना कुठे तरी मानापमान, इगो अडकला गेला आहे. तो बाजूला ठेवून एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत एकत्रित यावं, अशी माझ्यासह आमदार, सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना आहे.

यावेळी सय्यद यांनी संजय राऊत यांच्याबाबत विधान केले. त्या म्हणाल्या, संजय राऊत वाट्टेल ते बोलतात. काहीही बोलतात. ते बिनधास्त बोलतात. पण ती त्यांची शैली आहे. त्यामागे शिवसेनेला सपोर्ट करणं हीच त्यांची भावना असते.

Leave a Comment